न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जुलै २०२२) :- आकुर्डीतील अप्पर तहसील कार्यालयाचे स्थलांतर करण्यात येत आहे. अभिलेख कक्षासह नागरिक सुविधा केंद्राचेही स्थलांतर होत आहे.
आकुर्डी येथे तहसील कार्यालयाचे कामकाज सुरू होते. प्राधिकरणाचे पीएमआरडीएमध्ये विलीनीकरण केल्याने औंध येथून पीएमआरडीएचे कार्यालय आकुर्डी येथे स्थलांतरीत केले. त्यानंतर उपनिबंधक तहसील कार्यालय हलविण्यात यावे, असा शासनाकडे प्रस्ताव पाठविला. निगडीतील प्राधिकरणाच्या जुन्या प्रशासकीय इमारतीत या कार्यालयांचे स्थलांतर होणार आहे.
तहसीलदार गीता गायकवाड म्हणाल्या, निगडी येथील लोकमान्य टिळक चौकातील प्राधिकरणाच्या जुन्या प्रशासकीय इमारतीत पीएमआरडीच्या प्रस्तावानुसार कार्यालयाचे स्थलांतर करण्यात येत आहे. यात अभिलेखासह काही महत्त्वाचे दस्तावेज आहेत. त्यासोबतच काही तांत्रिक बाबी आहेत. त्यासाठी स्थलांतर प्रक्रियेत कार्यालयीन कामकाज बंद ठेवावे लागणार आहे. मात्र, तरीही नागरिकांना सर्व प्रकारचे दाखले ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे.