न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जुलै २०२२) :- ‘मी बालाजी नगरचा भाई आहे’ असे म्हणत फिर्यादीला ‘तुला मारूनच टाकतो’ अशी धमकी दिली. तसेच त्याच्यावर कोयत्याने वार केले. तसेच परिसरात दहशत माजवली. हा प्रकार भोसरीत घडला.
आदित्य बंडू फरताडे (वय १७, रा. बालाजी नगर) असे जखमी मुलाचे नाव आहे. फारुक ऊर्फ फाऱ्या शेख (वय २४, रा. भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. एमआयडीसी भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.