- नऊ प्रभागातून पुरुष मंडळी आउट; महापालिकेत यंदा महिलाराजचीच चलती?…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जुलै २०२२) :- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण पुन्हा मिळाले आहे. ते परत मिळण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते. दीर्घकाळ लढा देऊन इम्पिरिकल डाटा गोळा करून न्यायालयात सादर केला होता. त्यानुसार ओबीसींना आरक्षण मिळाल्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. मात्र, त्यासाठी अवघे दीड-दोनशे नागरिकच उपस्थित होते. त्यातही माजी नगरसेवकांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच होती. त्यामुळे आरक्षण मिळाले तरी, ओबीसींमध्ये निरुत्साह दिसून आला.
सर्वसाधारण महिलांसाठीचे आरक्षण काढण्यापूर्वी त्याबाबतची नियमावली अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सांगितली. त्यानंतर आरक्षण काढण्यासाठी पात्र प्रभागांच्या क्रमांकाच्या चिठ्ठ्या एक एक करून पारदर्शक ड्रममध्ये टाकल्या जात होत्या. त्यावेळी प्रभाग ४१ च्या क जागेची चिठ्ठीही होती. त्यावर भाजपचे सदाशिव खाडे यांनी आक्षेप घेतला. ‘अ जागा एससी महिला, ब जागा एसटी महिला असताना क जागा सर्वसाधारण महिलेच्या आरक्षणासाठी कशी काय ग्राह्य होऊ शकते?,’ असा आक्षेप त्यांनी घेतला. त्यानंतर नियमावली वाचण्यात आली व ‘तीन सदस्यांच्या प्रभागात दोन जागा महिलांसाठी आरक्षित असताना तिसरी जागाही महिलांसाठी आरक्षित करता येत नाही,’ या नियमानुसार क जागेची चिठ्ठी वगळून आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यामुळे मोठा गोंधळ टळला. कदाचित पुन्हा सोडत काढावी लागली असती किंवा तीनही जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या असत्या.
प्रभाग १४ निगडी, १७ संत तुकारामनगर, १९ मोहननगर, २० काळभोरनगर, २२ निगडी गावठाण, ३८ वाकड, ४१ कासारवाडी व ४४ पिंपळे गुरव काशीदनगर येथून इच्छुक असलेल्या पुरुष उमेदवारांसमोर अडचणी वाढल्या आहेत. एकतर त्यांना शेजारच्या प्रभागात लढावे लागेल किंवा कुटुंबातील महिलांना संधी द्यावी लागेल. कारण, या प्रभागांतील तीनपैकी प्रत्येकी एक जागा एससी, ओबीसी व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाली आहे.
पिंपरी महापालिकेचे प्रभागनिहाय आरक्षण…
प्रभाग क्रमांक प्रभागाचे नाव अ ब क
१ तळवडे-रुपीनगर-त्रिवेणीनगर ओबीसी सर्वसाधारण महिला खुला
२ चिखली गावठाण – कुदळवाडी अनुसूचित जाती सर्वसाधारण महिला खुला
३ मोशी, बोऱ्हाडेवाडी-जाधववाडी ओबीसी सर्वसाधारण महिला खुला
४ मोशी गावठाण-गंधर्वनगरी ओबीसी महिला सर्वसाधारण महिला खुला
५ चऱ्होली-चोविसावाडी-वडमुखवाडी ओबीसी सर्वसाधारण महिला खुला
६ दिघी-बोपखेल अनुसूचित जमाती सर्वसाधारण महिला खुला
७ भोसरी सॅण्डविक कॉलनी ओबीसी महिला सर्वसाधारण महिला खुला
८ भोसरी गावठाण-गवळीनगर ओबीसी महिला सर्वसाधारण महिला खुला
९ भोसरी, धावडेवस्ती ओबीसी महिला सर्वसाधारण महिला खुला
१० भोसरी, इंद्रायणीनगर-लांडेवाडी ओबीसी महिला सर्वसाधारण महिला खुला
११ भोसरी, बालाजीनगर अनुसूचित जाती महिला ओबीसी खुला
१२ चिखली,घरकुल-नेवाळेवस्ती ओबीसी महिला सर्वसाधारण महिला खुला
१३ चिखली, मोरेवस्ती ओबीसी महिला सर्वसाधारण महिला खुला
१४ निगडी, यमुनानगर अनुसूचित जाती महिला ओबीसी सर्वसाधारण महिला
१५ संभाजीनगर-पूर्णानगर-शाहूनगर ओबीसी महिला सर्वसाधारण महिला खुला
१६ नेहरूनगर-विठ्ठलनगर-यशवंतनगर अनुसूचित जाती ओबीसी महिला खुला
१७ संत तुकारामनगर-महात्मा फुलेनगर अनुसूचित जाती ओबीसी महिला सर्वसाधारण महिला
१८ मोरवाडी-अजमेरा कॉलनी
गांधीनगर-खराळवाडी अनुसूचित जाती महिला ओबीसी खुला
१९ चिंचवड स्टेशन-
मोहननगर-आनंदनगर अनुसूचित जाती महिला ओबीसी सर्वसाधारण महिला
२० काळभोरनगर-रामनगर-
अजंठानगर अनुसूचित जाती महिला ओबीसी सर्वसाधारण महिला
२१ आकुर्डी गावठाण-दत्तवाडी सर्वसाधारण ओबीसी सर्वसाधारण महिला खुला
२२ निगडी गावठाण-ओटास्किम अनुसूचित जाती ओबीसी महिला सर्वसाधारण महिला
२३ निगडी, भक्ती शक्ती-वाहतूकनगरी ओबीसी सर्वसाधारण महिला खुला
२४ रावेत-किवळे-मामुर्डी अनुसूचित जाती महिला सर्वसाधारण महिला खुला
२५ वाल्हेकरवाडी – अनुसूचित जाती, ओबीसी महिला, खुला
२६ चिंचवडेनगर-बिजलीनगर-दळवीनगर ओबीसी, सर्वसाधारण महिला, खुला
२७ चिंचवडगाव, उद्योगनगर, रामकृष्ण मोरे नाट्यगृह- ओबीसी, सर्वसाधारण महिला, खुला
२८ चिंचवड केशवनगर, श्रीधरनगर – ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, खुला
२९ भाटनगर-पिंपरी कॅम्प-मिलिंनदगर अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला, खुला
३० पिंपरीगाव-वैभवनगर ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, खुला
३१ काळेवाडी-विजयनगर-नढेनगर ओबीसी, सर्वसाधारण महिला, खुला
३२ तापकीरनगर-ज्योतीबानगर अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला, खुला
३३ रहाटणी-रामनगर ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, खुला
३४ थेरगाव, बापुजीबुवानगर-शिवतीर्थनगर अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण महिला, खुला
३५ थेरगाव, बेलठिकानगर-पवारनगर अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण महिला, खुला
३६ थेरगाव, गणेशनगर-संतोषनगर-पद्मजी ओबीसी, सर्वसाधारण महिला, खुला
३७ ताथवडे-पुनावळे अनुसूचित जाती महिला, ओबीसी, खुला
३८ वाकड अनुसूचित जाती, ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला
३९ पिंपळेनिलख-वाकड अनुसूचित जाती, ओबीसी महिला, खुला
४० पिंपळे सौदागर ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, खुला
४१ पिंपळेगुरव गावठाण-वैदुवस्ती-जवळकरनगर अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, खुला
४२ कासारवाडी-फुगेवाडी ओबीसी, सर्वसाधारण महिला, खुला
४३ दापोडी अनुसूचित जाती महिला, ओबीसी, खुला
४४ पिंपळेगुरव-काशीद नगर-मोरया पार्क अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती महिला, सर्वसाधारण महिला
४५ नवी सांगवी ओबीसी, सर्वसाधारण महिला, खुला
४६ जुनी सांगवी अनुसूचित जाती, ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, खुला


















