- देहूतील घटना; तरूणाविरोधात गुन्हा दाखल…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जुलै २०२२) :- वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागात चालक म्हणून नोकरी लावतो, असे आमिष फिर्यादीला दाखवले. नोकरीसाठी ऑनलाइन आणि रोख स्वरुपात आरोपीने फिर्यादीकडून सहा लाख ६६ हजार ५०० रुपये घेतले.
या बदल्यात आरोपीने तत्कालीन मंत्री अमित देशमुख आणि वैद्यकीय सचिव यांच्या नावाची खोटी सही असलेले कॉल लेटर दिले. ही घटना देहुगाव, पुणे, नाशिक आमदार निवास येथे घडली. गणपत एकनाथ गिते (वय ३७, मोशी, ता.हवेली) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. पोलिसांनी आरोपी शुभम सुनील पाटील (वय २६, रा. अमळनेर, जि. जळगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.