न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने निगडीत ४१ अनधिकृत पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. से. नं. २२ निगडी येथील प्रगती हौ. सो. परिसरातील सहा पत्राशेड तसेच अमरधाम स्मशान भुमीकडे जाणा-या रस्त्याच्या दुतर्फा झालेल्या ३५ अनधिकृत पत्राशेडवर झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागामार्फत कारवाई करण्यात आली.
सुषमा शिंदे, सक्षम प्राधिकारी तथा सहाय्यक आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली दत्तात्रय रामुगडे प्र. कार्यकारी अभियंता, सुनिल हरिदास, उप अभियंता श्रीकांत कोळप प्रशासन अधिकारी, झोनिषु विभाग यांचे व निगडी पोलिस स्टेशन यांचे नियंत्रणाखाली कारवाई करण्यात आली.















