न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०२२) :- पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीत कामे करणाऱ्या लॉर्सन अँण्ड टुब्रो (एल अॅण्ड टी) या कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे. अत्यावश्यक काम असल्याने पावसाळ्यातही खोदाईस परवानगी दिली. परंतु, त्यांनी अटी – शर्तीचे उल्लंघन केले असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये या कंपनीवर ८ लाख ४० हजार रुपये दंडात्मक कारवाई केली आहे.
पिंपरी – चिंचवड शहरात स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. एल अँड टी कंपनीसोबत २५ जानेवारी २०१९ रोजी करारनामा झाला असून त्यांना कामाचा आदेश देण्यात आला आहे. सिटी फायबर नेटवर्क ॲग्रीशन अॅक्सेस लेअर ॲण्ड वायफाय सीसीटीव्ही पोल बसविण्याचे नियोजन आहे. या कामासाठी कोअर (गाभा) आणि रस्ता व फुटपाथ खोदाई करावी, अँग्रीशनसाठी (एकत्रीकरण) करण्यात येणाऱ्या रस्ता खोदाईस पावसाळ्यातही परवानगी देण्यात आली आहे. अटी शर्तीनुसार काम करण्यात येत नसल्याचे आढळून आले. तसेच खोदकाम केल्यानंतर रस्ता व्यवस्थित न बुजवणे त्याची वेळेत दुरुस्ती न करणे अशा बाबी आढळल्या आहेत.
खोदकाम करून वेळेत रस्ता न बुजवणे तसेच निविदेतील अटी व शतींचा भंग केल्यामुळे एल अँड टी या कंपनीवर दंडात्मक कारवाई केली आहे. यावर्षी या कंपनीवर ४० हजार रुपये दंड आकारला आहे.
– मनोज सेठीया, कार्यकारी अभियंता…















