न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०२२) :- कासारसाई धरणाच्या कडेला स्काय डायनिंग हॉटेल उभारण्यात आलं आहे. क्रेनच्या सहाय्याने उभारण्यात आलेले हॉटेल १२०-१५० फुटांवर उंच नेऊन तिथे १५-२० ग्राहक एकाच वेळी जेवण करू शकतील असं नियोजन करण्यात आलं आहे.
जेवणाचा आस्वाद घेत तिथून ३६० डिग्रीचा परिसर पाहता येत होता. यामुळं हे हवेतील तरंगतं हॉटेल अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरलं होतं. परंतु, आता ते बंद ठेवण्याची वेळ हॉटेलचे मालक आकाश जाधव यांच्यावर आली आहे.
पोलिसांनी थेट हॉटेल मालक आकाश यांना नोटीस बजावली असून जोपर्यंत आवश्यक असलेल्या परवानग्या घेतल्या जात नाही तोपर्यंत हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.