न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०२२) :- पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपीवर कारवाई करण्यासाठी पोलीस आरोपीच्या घरी गेले. त्याला पोलिसांसोबत सांगवी पोलीस ठाण्यात येण्याबाबत कळवले. त्याने घरातून कोयता आणला आणि कोयता घेऊन पोलिसांच्या अंगावर धावून आला.
तुम्ही मला पोलीस स्टेशनला घेऊन जाल तर याद राखा, अशी धमकी देत त्याने सरकारी कामात अडथळा निर्माण केला. हा प्रकार शुक्रवारी (दि. २९) दुपारी पिंपळे गुरव येथील वैदुवस्ती येथे घडला.
पोलीस नाईक अनिल देवकर यांनी सांगवी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबाबत फिर्याद दिली आहे. मनोज गांधी लोखंडे (वय २०, रा. पिंपळे गुरव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.