न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ ऑगस्ट २०२२) :- मोशी टोल नाक्याजवळील फ्लिपकार्ट प्रा. इंडिया लि. या कंपनीतून आरोपींनी संगनमत करून एक लाख २७ हजार ७१५ रुपये किमतीच्या वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरल्या.
या प्रकरणी आनंद रामप्रसाद रतन (रा. मोशी टोल नाक्याजवळ, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. जगदीश चन्नप्पा गौडशेट्टी (गणराज हौसिंग सोसायटी, भोसरी), सूरज राजू कांबळे (रा. इंद्रायणी पार्क, मोशी) या दोन कामगारांसह लक्षराज अरुण गुरव (रा. हिंदवी कॉलनी, देहूफाटा) या सुरक्षारक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.
एमआयडीसी भोसरी पोलिसांनी या आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना शुक्रवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास सुरू आहे.
















