न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ ऑगस्ट २०२२) :- उच्च न्यायालय, मुंबई यांनी कोल्हापूर, सांगली, कुपवाड आणि पुणे महानगरपालिकेतील शालेय पोषण आहार निविदा तसेच दिलेल्या पुरवठा आदेशाला स्थगिती दिली आहे.
त्याच अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील शालेय पोषण आहार निविदा अथवा पुरवठा आदेशाला देखील आयुक्तांनी त्वरित स्थगिती द्यावी, अशी मागणी शिवसेना महिला संघटिका मंदा फड यांनी आयुक्त राजेश पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे. तसेच या मागणीचा विचार झाला नाही तर आम्हालादेखील पुढील कारवाईसाठी उच्च न्यायालयात जावे लागेल, असा इशारा देखील दिला आहे.