- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून पालिकेचा सर्वेअर ताब्यात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ ऑगस्ट २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगररचना विभागातील सर्वेअरला लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.
पालिकेच्या मुख्यालयातील तळमजल्यावरील नगररचना विभागात आज बुधवारी (दि. ३) रोजी दुपारी अडीचच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. प्रशासक राजवटीतदेखील लाचेची मागणी झाल्याने महापालिकेत खळबळ उडाली आहे.
संदीप लबडे असे लाच मागणाऱ्या सवेंअरचे नाव आहे. त्याने दोन लाखांची लाच मागितली होती. ही लाच कोणत्या प्रकरणात आणि कशासाठी मागितली याचे अद्याप स्पष्टीकरण अद्याप झाले नाही. संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती सूत्रांकडून समजली.