न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ ऑगस्ट २०२२) :- चिंचवड येथील चेतना बार अँड रेस्टॉरंटमध्ये आरोपी आले. तलवारीचा धाक दाखवत दहा हजाराचा हप्ता देण्याची फिर्यादीकडे मागणी केली. फिर्यादी यांनी नकार देताच आरोपींनी हॉटेलची तोडफोड करत फिर्यादीला शिवीगाळ केली व ठार मारण्याची धमकी दिली.
तसेच शेजारी असणाऱ्या श्री ग्राफिक्स फ्लेक्स प्रिंटींग व कृष्णा सुपर मार्केट येथील दुकान मालकांनाही शिवीगाळ करत तलवार दाखवत दहशत पसरवली. यावेळी त्यांनी तेथे उपस्थित नागरिकांसमोर तलवारी हवेत उंचावून दहशत निर्माण केली.
ही घटना मंगळवारी (दि. २) सायंकाळी पावणेपाचच्या दरम्यान चिंचवड येथे घडली. राजेंद्र जयकर शेट्टी (वय. २८ रा चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ओंकार उर्फ हेमंत ओव्हाळ व अक्षय जगताप (दोघेही राहणार भिमनगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.