- विविध विधायक उपक्रमांनी जिंकली प्रभागातील नागरिकांची मनं…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ ऑगस्ट २०२२) :- युवानेते अतिश बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागात सक्षम सोशल फाउंडेशन व अतिश बारणे युवा मंचतर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम घेण्यात आले. महादेव मंदिर, बारणेवस्ती मोशी येथे कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच महादेव मंदिर भजनी मंडळ, बारणेवस्ती, मोशी यांना मृदंग, स्वर पेटी, वीणा, टाळ साहित्याचे वाटप करण्यात आले. वाघेश्वर मंदिर बोऱ्हाडेवाडी व संजय गांधी नगर व बारणेवस्ती मोशी येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, संभाजी बोऱ्हाडे, भानुदास बोऱ्हाडे, काळूराम बोऱ्हाडे, शांताराम बो-हाडे, सुरेश बोऱ्हाडे, अजिंक्य बो-हाडे, प्रकाश गव्हाणे, योगेश बारणे, दीपक बारणे, गोरक्षनाथ बारणे, शुभम आल्हाट, अक्षय बोऱ्हाडे, सतिश बो-हाडे आदी उपस्थित होते.
मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तदान शिबीर, मधुमेह व हृदय विकार, मोफत बांधकाम कामगारांना सुरक्षा कीट, आहार व जीवनशैली मार्गदर्शन, रेनकोट वाटप, घरकाम महिलांना छत्री वाटप, ट्राफिक पोलिसांचा सन्मान, सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप, भाजी विक्रेत्यांना छत्री वाटप. तसेच नागेश्वर विद्यालयातील मुलींचे हिमोग्लोबीन चेकअप व तज्ज्ञ डॉ. प्रगती चौघुले यांनी मुलींना मार्गदर्शन केले. या वेळी विद्यालयाचे प्रा. दिलीप इचके, भारती फुगे, योगेश बारणे आणि मान्यवर उपस्थित होते.
प्रिती इंग्लिश मिडीयम स्कूल, गायकवाड वस्ती येथे तज्ञ डॉ. प्रगती चौघुले यांच्या मार्गदर्शनासाठी महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर व हाडांची तपासणी करण्यात आली. यावेळी प्रिती मिसाळ, प्रतिक मिसाळ, विद्यार्थी व शिक्षकवृंद इ. मान्यवर उपस्थित होते. तसेच मोशीतील १० वी १२ वी गुणवंत विध्यार्थांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संजोग वाघेरे नगरसेवक विक्रांत लाडे, नगरसेवक मयूर कलाटे, संभाजी बो-हाडे, संजय बोऱ्हाडे, रमेश गायकवाड, अक्षय आल्हाट, अमित गळ, दीपा बोराटे, अभिराज गहाणे उपस्थित होते.
तसेच शिव मंदिर भजनी मंडळास भजन साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कामगार नेते इरफान सय्यद, संजय वाबळे, तेजस झोडगे, वसंत बोराटे, टाटा युनियनचे अध्यक्ष सचिन लांडगे, कविता आल्हाट, धनंजय भालेकर, प्रवीण भालेकर, विलास कातोरे, आप्पा बागल, यश साने उपस्थित होते.