न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑगस्ट २०२२) :- फिर्यादी व त्याचे दोन मित्र हे एकाच्या घरी गेले. तेथे त्यांनी मित्राच्या आईला त्याला समजावून सांगण्यास सांगितले. यावरून चिडून फिर्यादी हा त्याच्या मित्रासोबत बसला असताना तेथे त्याचा मित्र आला. त्याच्यासोबत त्याचे साथीदारही होते. त्यांनी फिर्यादिला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी कोयत्याच्या उलट्या बाजूने फिर्यादीच्या पाठीत, डोक्यात मारले. डोक्यातून रक्त आल्यानंतर त्यांनी मारणे थांबवले फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी दिली.
तर दुसऱ्याने दिलेल्या फिर्यादीत जुन्या भांडणाचा राग मनात धरून ऋशिकेष याने रितेशला कोयत्याच्या मुठीने मारहाण केली, तसेच फिर्यादीच्या मित्राच्या गाडीची तोडफोड केली. यामध्ये फिर्यादी व त्याचे मित्र जखमी झाले आहेत. या हे दोन्ही प्रकार सोमवारी (दि. १) रात्री दहा वाजता पिंपरी येथे घडले. ऋषीकेश सचिन जमदाडे (वय १९ रा. पिंपरी) याने पिंपरी पोलीस ठाण्यात पहिली फिर्याद दिली असून सिद्धार्थ वाघमारे (रा.पिंपरी), आशिष पाल (रा.पिंपरी), रितेश किर्ते व त्यांचे चार साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसरी फिर्याद रितेश याने दिली आहे. फिर्यादित ऋषिकेश जमदाडे, अविनाश प्रकाश माने, अक्षय केशव आम्ले व त्यांचे तीन साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















