न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑगस्ट २०२२) :- वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी (दि. ५ ऑगस्ट) पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात जेलभरो आंदोलन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नेते मानव कांबळे, अशोक मोरे, माजी नगरसेवक बाबू नायर, माजी नगरसेविका निर्मला कदम, महिला शहराध्यक्ष सायली नढे, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, दिलीप पांढरकर, सेवादल अध्यक्ष विरेंद्र गायकवाड, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, ग्राहक सेल अध्यक्ष झेविअर अंथोनी, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अभिमन्यू दहीतुले, डॉ. मनीषा गरुड, छायाताई देसले, स्वाती शिंदे, आशा भोसले, अनिता अधिकारी, उषा साळवी, सुप्रिया पोहरे, भारती घाग, सुनीता जाधव, सुवर्णा कदम, शितल सिकंदर, रिटा फर्नांडिस, सीमा हलकट्टी, महानंदा कसबे, प्रियंका मलशेट्टी, चक्रधर शेळके, भाऊसाहेब मुगुटमल, अर्जुन लांडगे, लक्ष्मण रुपनर, बाबा बनसोडे, किरण खाजेकर, मेहबूब शेख, पांडुरंग जगताप, उमेश बनसोडे, सौरभ शिंदे, किरण नढे, विशाल सरवदे, मिलिंद फडतरे, झुबेर खान, विजय ओव्हाळ, आबा खराडे, हरीश डोळस, अण्णा कसबे, नितीन खोजेकर, गौतम ओव्हाळ, सतीश भोसले, संदीप शिंदे, आकाश शिंदे आदी उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या विरोधी घोषणा देण्यात आल्या. पोलिसांनी आंदोलकांना यांना अटक केली.