न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑगस्ट २०२२) :- पायी रस्ता ओलांडत असताना फिर्यादी यांच्या वडीलांना भरधाव वेगाने जाणा-या रिक्षाने धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने डोक्याला, डोळ्याला, छातीला मार लागला. त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.
बाळू शांताराम कोळेकर (वय ५५) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. ४) सकाळी चिंचवड येथील चापेकर चौक ते महावीर चौक रस्त्यावर घडला. दशरथ बाळू कोळेकर (वय ३२, रा. अजंठानगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार रिक्षा (एमएच १४/जीसी ९८२७) चालक संतोष सुखदेव बगाडे (रा. जाधववाडी, चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.