न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑगस्ट २०२२) :- नागरिकांमध्ये पुस्तक वाचण्याची आवड निर्माण व्हावी, पुस्तक वाचन चळवळीला चालना मिळावी, या उद्देशाने “वाचनवेल पुस्तक भिशी” सुरू करण्यात आली. याबरोबरच साहित्यिकांचा वाचकांशी संपर्क व्हावा, म्हणून वाचनवेल प्रतिष्ठानने द्वितीय वार्षिक स्नेहमेळाव्याचे” आयोजन केले आहे. शनिवारी, रविवारी भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे सभागॄह येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती वाचनवेलच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रविवारी महाकरंडक स्पर्धेचा निकाल आणि विजेत्यांचा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. शनिवारी पहिले सत्राचे उद्घाटन आणि वाचनवेल अखिल भारतीय महा करंडक काव्य स्पर्धेचा प्रारंभ होईल. तसेच स्नेह मेळावा सायंकाळी पाच वाजता होईल.
या स्नेहमेळाव्यास सर्व साहित्यिक, लेखक, कवी आणि वाचकांना मोफत प्रवेश असून इच्छुकांनी प्रवेश पत्रिकेसाठी 9527862918, 8668899331, 8668899331 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.