न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑगस्ट २०२२) :- दहा वर्षीय मुलगा घराजवळ त्याच्या मित्रांसह खेळत होता. दरम्यान, आरोपींनी पीडित मुलाला बोलावून घेतले. त्याच्यावर एका रिक्षात अत्याचार केला. ही घटना पिंपरीतील मोरवाडी येथे घडली.
पीडित मुलाच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. स्वप्नील नंद शिंदे (वय २५, रा. लालटोपीनगर, मोरवाडी, पिंपरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल आहे. पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.