न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२२) :- पुणे- नाशिक महामार्गावर भरधाव दुचाकीवर झाड कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. भोसरीवरून नाशिक फाट्याकडे जात असताना भोसरी पोलीस ठाण्याच्या समोरच आज शनिवारी (दि. ६ ) रोजी सकाळी सात वाजता घटना घडली आहे.
समाधान नथू पाटील (वय ३६), निलेश राजेश शिंगाळे (वय ३७) असे या अपघातामधील मृतांची नावे आहेत. दुचाकीवरील दोघांनी हेल्मेट घातले होते. परंतू, झाड थेट डोक्यात पडल्याने गंभीर जखमी होऊन दोघांचा मृत्यू झाला.
झाड दुचाकीवर पडल्यानंतर दुचाकी काही अंतरावर फरफटत गेली होती. झाड पडल्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी झाड कापून बाजूला करत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे.