न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑगस्ट २०२२) : – रावेत येथील एस बी पाटील ज्यु कॉलेजकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या राज्याचे विशभूषा तसेच सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता, देशभक्ती वर जय घोषणा या कार्यक्रमांमुळे महाविद्यालयाच्या आवारात देशभक्तीची लहर निर्माण झाली.
यावेळी रावेत पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे, सोमनाथ गुजर, गोविंद जगताप, महादेव शिंदे, सहाय्यक.आरोग्य अधिकारी शंकर घाटे, विकास शिरोळे, सुखाजी किऺवडे, समाधान तळेकर, प्राचार्य संदिप पाटील आणि सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी अतिशय लयबद्ध आणि जोश पूर्ण सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. क्रीडा शिक्षक प्रदिप कासार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.