न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑगस्ट २०२२) :- माजी नगरसेवक शैलेश प्रकाश मोरे यांच्या पुढाकारातून भारताचा ७५ वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन प्रभाग क्रमांक १९ चिंचवड येथे विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
एम्पायर इस्टेट, विस्डम पार्क, कोहिनूर शांग्रीला सोसायटी, साहिल रेसिडेन्सी, आनंदनगर, चिंचवडगाव परिसरात घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यात आले. जवळपास तीन हजार नागरिकांना मोफत तिरंगा वाटप करण्यात आला. स्वातंत्र्यदिनी एम्पायर इस्टेट येथे तिरंगा रॅली काढत झेंडा चौकात झेंडा फडकविण्यात आला. जपानचे योग प्रशिक्षक क्लैरी नागशिमा यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. प्रभागातील माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. कोरोना लसीकरण मोहीमही राबविण्यात आली. आनंदनगर येथे खाऊ वाटप करण्यात आले.
याप्रसंगी मा. नगरसेवक प्रसाद शेट्टी, काळुराम पवार, एम्पायर इस्टेट येथील जेष्ठ नागरिक संघाचे संजय साळवी, हरीश ललवाणी, महेश कोरे, राम खेडकर, रामदास माळी, मीनाक्षी संकपाळ, सुबोध सावंत, अनिल पाटील, विजय पिंगळे, राजेंद्र चौथे, कल्याण देवघरे, कविता शैलेश मोरे. एम्पायर इस्टेटमधील नागरिक उपस्थित होते.












