न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑगस्ट २०२२) :- काळेवाडीतील साईनगरी हौसिंग सोसायटीतील नागरिकांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अनोखा उपक्रम राबवीत अनाथ मुलांना सायकलींचे आणि गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेन, चित्रकला पुस्तक, रंगपेटी, बसण्याचे गालीचे, किराणा सामान व खाऊचे वाटप केले.
सोसायटीत जून्या सायकली होत्या. सभासदांनी वर्गणी जमा करीत टाकाऊपासून टिकाऊ धोरणानुसार १३ सायकली दुरुस्त केल्या. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम या आश्रमशाळेतील मुलांना या सायकलींचे वाटप केले. संस्थेचे अध्यक्ष गिरिष प्रभुणे व सतिश अवचारे सर यांनी सभासद व सोसायटीचे कौतुक केले.
या उपक्रमात सोसायटीतील संजय जोगदंड, बाळासाहेब पावडे, गिरिष लोळगे, कुंदन वर्मा, प्रदिप बोरसे, आनंद कदम, प्रशांत नाईक, श्रीकांत पार्सेकर, सचिन घाडगे, निलेश पाटील, अविनाश देशमुख, अमोल मते, धनंजय येडे, ब्रिजेश सिंग आदी सभासदांनी सहकार्य केले.












