न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑगस्ट २०२२) :- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने दिघी येथे भारताच्या ७५ व्या स्वतंत्रतादिवस अमृत महोत्सव निमित्ताने “जागर राष्ट्रभक्तीच्या जाणीवांचा सन्मान माजी सैनिकांचा” हा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. युवक अध्यक्ष इम्रानभाई शेख यांच्या संकल्पनेतून माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी १५० माजी सैनकांचा सन्मान करण्यात आला व त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला आणि भेटवस्तू म्हणून छत्री देण्यात आली.
युवक अध्यक्ष इम्रानभाई शेख म्हणाले “टीव्ही इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या या युगात भारतीय युवक भरकटलेल्या अवस्थेत असून स्वतंत्रता आणि पारतंत्रता याचे फरक युवकांना कळावे व युवकांना देशाप्रति आदर निर्माण व्हावा याच्यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून देशासाठी बॉर्डरवर आपल्या जीवाची बाजी लावणारे माजी सैनिक यांना सन्मानित करण्याचे ठरवले. या सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून माजी सैनिकांचे अनुभव युवकांना ऐकावयास मिळतीलया संकल्पनेतून हा कार्यक्रम आम्ही घेतला. फक्त बॉर्डरवर जाऊन देश सेवा करता येत नाही तर सामाजिक कामात भाग घेवून, पर्यावरण जपून, सामान्य नागरिकांच्या मदतीला धावून त्यांचे प्रश्न सोडवून देखील करता येते असे देखील ते यावेळेस म्हणाले.
शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, ७५ व्या अमृत महोत्सवी स्वतंत्रता दिना निमित्त शहरात खूप कार्यक्रम झाले त्यापैकी माजी सैनिकांचा सन्मान करून सर्वात चांगला कार्यक्रम राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून इम्रान शेख व त्यांच्या टीमने घेतला. खरंतर देश सेवा करणाऱ्या जवानांची उंची व महत्त्व खूप मोठे असून आम्ही सर्व त्यांच्यासमोर खूप छोटे आहोत. सर्व नागरिकांना मी एक विनंती करतो की देशाच्या बद्दल प्रेम हे फक्त २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट पुरत मर्यादित न राहता पूर्ण ३६५ दिवस आपल्या कृतीतून दिसले पाहिजे असे देखील अजित गव्हाणे म्हणाले.
या सन्मान सोहळ्यास पिंपरी चिंचवड चे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर साहेब, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, कॅप्टन चव्हाण साहेब, कॅप्टन भुसे सर मोठ्या प्रमाणात माजी सैनिक अधिकारी तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रसन्न डांगे, निलेश भाऊ निकाळजे, युवा नेते राहुल पवार, राष्ट्रवादी लीगल सेलचे अध्यक्ष एडवोकेट सोनाली गाडगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रकाश डोळस, लवकुश यादव, तुषार ताम्हणे, रोहित वाबळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस दीपक गुप्ता, नितीन सूर्यवंशी, अनुज देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर सचिव ओम शिरसागर, निखिल गाडगे, कुणाल जगताप, रुबान शेख, अनिल चव्हाण, सुरज बोराटे, नैनिल रुणवाल व मोठ्या संख्येने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.











