- माजी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांची अति. आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑगस्ट २०२२) :- कुदळवाडी मनपा शाळेत शिक्षक संख्या वाढवण्याबाबत माजी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना लेखी निवेदन देऊन शिक्षक वाढविण्मायाबाबत मागणी केली आहे.
कुदळवाडी मनपा शाळा क्रमांक ८९ या ठिकाणी शिक्षक संख्या कमी आहे. त्या ठिकाणी नवीन शिक्षकांची नियुक्ती करून शाळेतील विद्यार्थ्यांची पालकांची गैरसूर दूर करावी. या मनपा शाळेत ८०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक कमी पडत आहेत. वारंवार मागणी करून महानगरपालिका शिक्षण विभाग या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत, असे या निवेदनात यादव यांनी म्हटले आहे.
दरम्यान अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी यावर गांभीर्याने विचार करून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करू, असे आश्वासन यादव यांना दिले.


















