न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑगस्ट २०२२) :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्ताने निगडी येथील श्रीकृष्ण चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने मॉडर्न फार्मसी कॉलेज निगडी तसेच पिंपरी चिंचवड ब्लड बँक यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर व मोफत कोरोना लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. ३५० जणांना कोरोना मोफत लसीकरण, बूस्टर डोस दिले गेले. तर ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक के. जी. मुनोत यांच्या वतीने शैक्षणिक व वैद्यकीय मदतीसाठी गरजूंना धनादेश देण्यात आला. यावेळी उद्योन्मुख कलाकार कु. धनश्री घोडे, ४५००० लसीकरण उद्दीष्ट पूर्ण केल्याबद्दल शेखर पेठकर व पिपंरी चिंचवड रक्तदान पेढीचे मकरंद शहापूरकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते सुनील चेकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. समाजसेवक शरदचंद्र पाटणकर, ओमप्रकाश पेठे, बी.एल जोशी, अनिल झोपे, दिलीपसिंह मोहिते, सलीम शिकलगार,सुदाम भोरे,अंशुल शर्मा, जॉनी थडानी, कृष्ण मंदिराचे अध्यक्ष हरिदास नायर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, लायन हरिदास नायर व राजीव कुटे यांनी केले होते. कार्यक्रमासाठी सविता निंबाळकर व ऋषीकेश मुसमाडे आदींनी विशेष परिश्रम केले. श्रीकृष्ण मंदिराचे सचिव शशिधरन सी.पी. यांनी उपस्थितीतांचे स्वागत केले.


















