न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑगस्ट २०२२) :- श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त रावेत येथील आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) मंदिरात शुक्रवारी (दि. १९) विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. रावेत येथील मंदिरात श्रीकृण जन्माष्टमीच्या महामहोत्सव सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत चालणार आहे.
या वेळी भजन प्रवचन, कीर्तन, अभिषेक, विशेष दर्शन व महाआरती असे विविध कार्यक्रम होणार आहेत. जन्माष्टमिनित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील. बालसंस्कार वर्गातील मुले भगवद्गीतेलील श्लोक पठण, कृष्णकथांचे कथाकथन, हृदयांतर हे बोधपर नाटक, कृष्णस्तुतीपर भरतनाट्यम यांचा समावेश आहे. मंदिरात दिवसभर ‘ हरे कृष्ण ‘ महामंत्राचे कीर्तन होणार आहे.


















