- मावळते आयुक्त राजेश पाटील यांची अनुपस्थिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑगस्ट २०२२) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त शेखर सिंह यांनी आज गुरुवारी (दि. १८) सायंकाळी पाचच्या सुमारास मावळते आयुक्त राजेश पाटील यांच्या अनुपस्थित आयुक्त व प्रशासक पदाचा पदभार स्वीकारला. सायंकाळी ६.३० वा. ते प्रसार माध्यमांशी संवाद साधणार आहेत.
यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, रविकिरण घोडके, वामन नेमाणे, अण्णा बोदडे, राजेश आगळे आदी अधिकारी उपस्थित होते.
शेखर सिंह हे २०१२ च्या बॅचचे अधिकारी आहेत. देश पातळीवर त्यांचा ३०६ वा क्रमांक होता. सिंह हे आयआयटी गुवाहटीचे (इंडियन इन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी) पदवीधर आहेत. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील बर्केली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून स्ट्रॅक्चरल इंजिनिअरिंग शाखेची पदव्युत्तर पदवी घेतली आहे. नागपूरचे सहायक जिल्हाधिकारी, रामटेकचे प्रांताधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी, साताऱ्याचे जिल्हाधिकारी म्हणून सिंह यांनी काम पाहिले आहे.


















