न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑगस्ट २०२२) :- पोदार इंटरनॅशनल स्कूल चिंचवड या अंतर्गत पोदार ‘ थंडर १० ” आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा शनिवार (दि. २०) ते रविवार (दि. २१) दरम्यान होणार आहे. यात पुणे शहर परिसरातील पोदार इंटरनॅशनल स्कूल इंग्रजी माध्यमाच्या १४ शाळांचे संघ सहभागी होणार आहेत.
पुण्यातील पोदार शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये फुटबॉल खेळण्याची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने ‘ पोदार थंडर १० ‘ आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा आयोजित केली आहे, असे पोदार पुणे हबचे महाव्यवस्थापक फ्रँकलिन सर यांनी सांगितले.
पोदार इंटरनॅशनल स्कूल चिंचवडच्या मैदानावर फुटबॉल स्पर्धा होणार आहे. विजयी संघाला चषक, प्रशस्तीपत्र देवून सन्मानित केले जाईल. स्पर्धेत रोज सकाळी आठ ते दुपारी पाच यावेळेत सामने होतील. स्पर्धेचे उदघाटन शनिवारी सकाळी साडेआठ वाजता होणार आहे. अंतिम सामना रविवारी दुपारी होणार असून यानंतर बक्षीस वितरण होणार आहे, अशी माहिती पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या शहनाज कोटार यांनी दिली.