न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑगस्ट २०२२) :- विस्टा इम्प्रेस, वाकड येथे फिर्यादी आणि त्यांच्या मुलाचा फ्लॅट होता. या फ्लॅटचे खरेदीखत फिर्यादी यांच्या नावावर नव्हते. त्यामुळे आरोपींनी खरेदीखत करून देण्याच्या बहाण्याने फ्लॅट बँकेकडे गहाण ठेवून दोन कोटीचे कर्ज घेतले आणि फिर्यादी आणि फिर्यादीच्या मुलाची १ कोटी ८५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
हा प्रकार २०१७ ते फेब्रुवारी २०२२ या दरम्यान वाकड येथे घडला. लखमशी कांजीभाई पटेल (वय ७३, रा. वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी चैतन्य कालबाग (वय ६०, अंंधेरी. मुंबई), दीपक शिवशरण प्रजापती (वय ४६, मुंबई) यांच्यासह एका महिला आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
















