न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ सप्टेंबर २०२२) :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी कॅम्प परिसरात पोलिसांनी संचलन केले. शगुन चौक, साई चौक, डिलक्स चौक, जमतानी चौक, भाटनगर परिसरात हे संचलन करण्यात आले.
संचलनामध्ये पिंपरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे, पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, १० अधिकारी, राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी, आरसीपी, ११० पोलीस अंमलदार, मुख्यालयातील होमगार्ड आदींनी या संचलनात सहभाग घेतला.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी – चिंचवड पोलिसांनी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. गुन्हेगारीची कीड ठेचण्यासाठी कोम्बिंग, संचलन, प्रतिबंधात्मक कारवायांना पोलिसांनी वेग दिला आहे. गणेशोत्सवानंतर इतर सण, उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. दरम्यानच्या कालावधीत तसेच महापालिका निवडणुका देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीने डोके वर काढू नये यासाठी पोलिसांकडून हे उपक्रम राबविले जात आहेत.















