न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ सप्टेंबर २०२२) :- दारूच्या नशेत मयत इसमाने घराच्या खिडकीतुन साडीच्या साहाय्याने खाली उतरण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचा हाथ निसटल्याने ते पाचव्या मजल्यावरून थेट खाली कोसळले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
निगडी ओटास्कीम येथील प्रेरणा सोसायटी येथे बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. अनिल सुदाम कांबळे (वय ५०) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. अनिल हे मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचं निगडी पोलिसांनी सांगितल आहे.















