न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२२) :- गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरीतील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. पिंपरी चौकातून शगुन चौकाकडे जाण्यासाठी सर्व वाहनांना प्रवेश बंद असेल. या मार्गावरील वाहने पिंपरी पुलावरून उजवीकडे भाटनगरमार्गे इच्छितस्थळी जातील. हा बदल ४, ६, ८ व ९ सप्टेंबरला सायंकाळी चार ते रात्री बारा या वेळेसाठी असेल.
मोरवाडीमार्गे एम्पायर इस्टेट येथील सेंट मदर टेरेसा पुलावरून काळेवाडी मार्गे इच्छितस्थळी जातील. तसेच काळेवाडी पुलावरून येणाऱ्या वाहनांना डिलक्स चौक, कराची चौकाकडे जाण्यास प्रवेश बंद असेल. ही वाहने काळेवाडी पुलावरून उजवीकडे वळून जमतानी चौक व गेलार्ड चौकाकडे महात्मा फुले कॉलेज, डेअरी फार्म मार्गे मुंबई-पुणे महामार्गाने जातील.
पिंपरी चौकातून गोकुळ हॉटेलकडे जाण्यास प्रवेश बंद असेल. या मार्गावरील वाहने पिंपरी चौकाकडून सेवारस्त्याने क्रोमा शोरूमसमोरुन पुढे जातील.















