न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ सप्टेंबर २०२२) :- गणपती विसर्जनाच्या दिवशी चिंचवडमधील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. हा बदल शुक्रवारी (दि. ९) रोजी दुपारी तीन ते रात्री बारा या कालावधीसाठी असेल. चापेकर चौकाकडे येणारी वाहतूक बंद राहणार असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
अहिंसा चौक ते चापेकर चौकाकडे येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद असेल. या मार्गाने जाणारी वाहने एसकेएफ चौकातून खंडोबा माळाकडून मुंबई-पुणे महामार्गाने इच्छितस्थळी जातील. दळवीनगर पुलाकडून चापेकर चौकाकडे येणारी वाहने एसकेएफ चौकाकडून बिजलीनगरमार्गे पुढे जातील. वाल्हेकरवाडी टी जंक्शनकडून चाफेकर चौकाकडे जाण्यास वाहनांना बंदी असेल. ही वाहने वाल्हेकरवाडी जुना जकातनाका येथून डावीकडे वळून जैन शाळेपासून बिजलीनगर अथवा एसकेएफ मार्गे खंडोबामाळ मार्गे इच्छितस्थळी जातील. लिंकरोडवरून चापेकर चौकातील पीएमटी बस थांबा येथून चापेकर चौकात जाण्यास मनाई असेल. या मार्गाने येणारी वाहनांनी डावीकडे वळून काळेवाडी मार्गे जावे. भोई आळी व चिंचवड चौकी येथून चापेकर चौकात जाण्यास जाण्यास मनाई असल्याने या मार्गावरील वाहनांनी केशवनगर मार्गे पुढे जावे.
चिंतामणी चौक वाल्हेकरवाडी रिव्हर व्ह्यू चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी चिंचवडे फार्म वाल्हेकरवाडी रावेत ब्रीजवरून पुढे जावे. अहिंसा चौक व रिव्हर व्ह्यू चौकाकडून चापेकर उड्डाणपुलावरून येणारी वाहतूक बंद असेल. या मार्गावरील वाहनांनी रिव्हर व्ह्यू चौकाकडून वाल्हेकरवाडी मार्गे इच्छितस्थळी जावे. अहिंसा चौक ते महावीर चौक किंवा एसकेएफ चौक मार्गे इच्छितस्थळी जाता येईल.















