न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ सप्टेंबर २०२२) :- नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये, विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे, यासाठी महापालिकेने जनंसवाद सभा आयोजित केल्या जात आहेत.
सोमवारी (दि. ५) सकाळी १० ते १२ यावेळेत आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा होईल. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय मुख्य समन्वय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
यात उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, सतीश इंगळे, श्रीकांत सवणे, शहर अभियंता मकरंद निकम, सहायक आयुक्त प्रशांत जोशी, उपआयुक्त अजय चारठाणकर यांचा समावेश आहे. क्षेत्रीय कार्यालयनिहाय जनसंवाद सभा त्यांच्या अध्यक्षतेखाली होतील.















