न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ सप्टेंबर २०२२) :- ब्रँडेड कंपनीचा लोगो वापरून आरोपींनी कपड्यांची विक्री केली. पिंपरीतील एसपी ट्रेडर्स, खुशी ड्रेसेस, सत्यम कलेक्शन, वनूर कलेक्शन या दुकानांमध्ये पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. फिर्यादी यांनी याप्रकरणी कॉपीराईट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
सिद्धेश सुभाष शिर्के (वय २९ रा. मुंबई) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कमलेश राजेंद्रप्रसाद यादव (वय ४२ रा. काळेवाडी), अब्दुल हन्नान मेहंदी मंसूरी (वय ४०, रा. काळेवाडी), राजेश भगवानदास लालचंदानी (वय ४५ वर्षे, रा. पिंपरी), शफिक गुलमोहम्मद शेख (वय ४५, रा. काळेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.















