न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ सप्टेंबर २०२२) :- पिंपळे सौदागर येथील जगताप डेअरी चौक येथे स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी मंगळवारी (दि. ६) रोजी सापळा रचून कारवाई केली.
या कारवाईत पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली. पाच हजाराची रोकड, १४० रुपये किमतीचे इतर साहित्य आठ हजार रुपये किमतीचा एक मोबाईल फोन, असा १३ हजार १४० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
स्पा सेंटरची महिला चालक-मालक (वय ३७, रा. नवी सांगवी) आणि स्पा सेंटरचा मॅनेजर रमेश कुमार साहीराम (वय २४, रा. गंगानगर, राजस्थान) यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.















