न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ सप्टेंबर २०२२) :- कासारवाडीतील हॉटेल कलासागर येथून फिर्यादीच्या भावाचा मुलगा आकुर्डी येथील रूमवर जात होता. त्यावेळेस बी.आर.टी. रोड क्रॉस करीत असताना पीएमपीएल बसच्या चालकाने बस वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात बस चालविली. यात तरुणाला धडक बसली.
अपघातात तरुणाच्या डोक्याला गंभीर जखम झाली त्यातच त्याचा मृत्यू झाला. उमेश राठोड (वय २२, सध्या रा. आकुर्डी मूळ रा.कोळवाडी, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
ताराचंद राठोड, (वय ५३, रा. ता. पडेगाव, जि. औरंगाबाद, मूळ रा. कोळवाडी, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जावेद शेख (वय ५०, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) याच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


















