- मनसेप्रमुख राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांच्या शहरातील गणेश मंडळांना भेटी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ सप्टेंबर २०२२) :- पिंपरी (दि. ९ सप्टेंबर २०२२) :- मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी पिंपरी चिंचवड शहरातील विविध गणेश मंडळांना गुरुवारी भेटी दिल्या. भेटीदरम्यान प्रभागातील व शहरातील २३८ मंडळांशी हितगुज साधत श्रींचे दर्शन घेतले. मागील दोन वर्ष कोविडचा काळ कठीण होता. त्यावेळी शहर मनसेने कोणताही भेदभाव न करता सर्वांना मदतीचा हात पुढे केला. त्याची जाणीव शहरातील नागरिकांना आहे. यासारख्या चांगल्या कामांच्या बळावरच आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत मनसे चांगले यश मिळवेल, आशा आशावाद अमित ठाकरे यांनी व्यक्त केला.
दरम्यान अमित ठाकरे यांनी मोशीतील अष्टविनायक मित्र मंडळ, त्रिमुर्ती मित्र मंडळ, भोसरीतील सिद्धिविनायक मित्र मंडळ, चिंचवड येथील श्रीराम मित्र मंडळ, पिंपरीतील जय हनुमान मित्र मंडळ, चिंचवडगावातील नवतरुण मित्र मंडळ, पिंपरीगावातील पवनासागर मित्र मंडळ – पिंपरीगाव, काळेवाडीतील पंचनाथ मित्र मंडळ, डांगे चौकातील मयुरबाग मित्र मंडळ, किवळेतीळ बापदेव मित्र मंडळ अशा निवडणुक गणेश मंडळांना भेटी दिल्या.
अमित ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, यंदा कोरोनाचं सावट गणपती बाप्पाने दूर केलं आहे. शहरात मोठ्या थाटामाटात वाजत गाजत गणरायांचं आगमन झालं. सर्व गणेश मंडळांनी देखील महानगरपालिका प्रशासनाला व स्थानिक लोकप्रतिनिधींना चांगलं सहकार्य केल्याचं दिसतेय. त्याबद्दल सर्व गणेश मंडळांचे मनापासून हार्दिक आभार. नागरिकांनाही गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो.
यावेळी शहर अध्यक्ष सचिन चिखले, विद्यार्थी सेना अध्यक्ष हेमंत डांगे, उपाध्यक्ष बाळा दानवले, विभाग अध्यक्ष मयूर चिंचवडे, अंकुश तापकीर,विशाल मानकरी,दत्ता देवतरासे, प्रतिक शिंदे, श्रध्दा देशमुख, अक्षय नाळे, नारायन पठारे, प्रकाश त्रिमले, सुदिर जम, रेखा जम, सचिन शिंगाडे, विनोद भंडारी, सुशिल पोतदार, सगिता देशमुख, सुजाता काटे, सुशिल नेटके, सतिश कदम, राजु भालेराव, पुणे शहर पदाधिकारी प्रंशात कनोजिया, आशिष साबळे, अमोल शिंदे, सागर कुलकर्णी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना व अंगीकृत संघटनेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
















