न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर २०२२) :- टपरी उघडण्यासाठी गेले असता आरोपी याने जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने फिर्यादीला मारहाण कऱण्यास सुरुवात केली. फिर्यादी यांचा भाऊ भांडणे सोडविण्यासाठी आला असता त्यालाही आरोपींनी मारहाण केली.
लाकड़ी दांडके, दगड व सिमेंटचा गट्टूने मारहाण करत गंभीर जखमी केले व तेथून पळून गेले. हा प्रकार शुक्रवारी (दि. ९) सकाळी आठ वाजता दिघी गावठाण येथे घडला. योगेश हरीभाऊ वाळके (वय ३६ रा. दिघी गावठाण) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
किरण कदम, प्रणव चौरे, तौफीक बांगी, किरण नलावडे, प्रसाद भाले, बाबू कदम व इतर तीन ते चार व्यक्तीं विरोधात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. दिघी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















