न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ सप्टेंबर २०२२) :- दुचाकीवरून पुणे नाशिक महामार्गावरून जात असताना कळंब गावच्या हद्दीत वर्पेमळा येथे उजव्या बाजूने नारायणगावकडे चाललेली एसटी वेगाने आली. बसने मोटरसायकलच्या हँडलला धक्का दिला. त्यामुळे तोल जाऊन ती घसरून पडली.
दुचाकीवर मागे बसलेली महिला एसटीच्या मागील चाकाखाली सापडून डोक्यावरून चाक गेले. त्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
शारदा निवृत्ती भोर (वय ५८ रा. आर्वी, सध्या राहणार शिवसाई कॉलनी, चिंचवडेनगर, चिंचवडगाव ) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मयूर निवृत्ती भोर यांनी फिर्याद दिली असून अपघातास कारणीभूत ठरल्याबद्दल एसटी चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत.
















