न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर २०२२) :- काळेवाडी येथील बँक ऑफ बडोदा या बँकेमध्ये वॉचमन म्हणून फिर्यादी काम करतात. त्यांच्यासोबत आरोपी हा वॉचमन म्हणून काम करत होता.
फिर्यादी यांनी एटीएम मध्ये ठेवलेल्या बॅगेतील एटीएम कार्ड घेऊन आरोपीने वेगवेगळ्या एटीएममधून फिर्यादी यांच्या बँक खात्यावरून ९० हजार रुपये काढून घेत फसवणूक केली.
हा प्रकार २८ ते २९ ऑगस्ट या दरम्यान बँक ऑफ बडोदा काळेवाडी शाखा आणि इतर बँकेच्या एटीएममध्ये घडला. राजाराम शंकरराव यलजी (वय ७६, रा. थेरगाव) यांनी रविवारी (दि. ११) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अजय कुमार गिरी (रा. बाणेर. मूळ रा. पंजाब) असे गुन्हा दाखल झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.















