न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर २०२२) :- महिला व अल्पवयीन मुलगा जबरदस्तीने फिर्यादीच्या घरात शिरले. कमरेच्या पट्ट्याने त्यांना मारहाण केली. तसेच आरोपीने फिर्यादीचा पाठलाग करून फोनद्वारे शिवीगाळ करीत त्यांचा विनयभंग केला.
रहाटणीतील रामनगर येथे हा प्रकार घडला. पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पप्पू ऊर्फ सुनील बबन भोसले (वय ३९) याला पोलिसांनी अटक केली आहे. एक महिला व अल्पवयीन मुलगा (सर्व रा. म्हातोबानगर, वाकड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.















