न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२२) :- चौघांनी संगनमत करून काहीही कारण नसताना रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना लाकडी दांडक्याच्या सहाय्याने बेदम मारहाण करून मुक्या प्राण्यांना कुरतेने वागणूक दिली.
त्यापैकी तीन कुत्र्यांना विकलांग व आगळीक करून एका काळ्या रंगाच्या कुत्र्याला लाकडी दांडक्याच्या सहाय्याने तोंडावर, पायावर जबर मारहाण करून जिवे ठार मारून कुत्र्याची बॉडी कोठेतरी अज्ञात स्थळी टाकून व्हिलेवाट लावली आहे. हा प्रकार लोणावळ्यातील न्यु तुंगाली स्वारंग सोसायटी गोल्डव्हॅली सेक्टर डी. बंगला नं १२ परिसरात घडला.
प्रियंका व्हिस्पी बालापोरीया यांनी फिर्याद दिली आहे. नितीन विदप्पा आहिरे, राजेष गणेश आचार्य, संजय वासु आचार्य, मोहन यादव (सर्व रा. स्वारंग सोसायटी गोल्डव्हॅली सेक्टर डी. न्यु तुंगार्ली लोणावळा ता. मावळ जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा शहर पोलिस पुढील तपास करीत आहेत.















