- महापालिका आणि आयटीडीपी संस्थेत सामंजस्य करार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरामध्ये नॉन मोटराइज्ड ट्रान्स्पोर्ट (एनएमटी) या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका आणि आयटीडीपी संस्था (इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सपोर्ट अँड डेव्हलपमेंट पॉलिसी) यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला.
या करारामुळे शहरातील नागरिकांमध्ये ‘ मोटराइज्ड ट्रान्स्पोर्ट ‘ विषयासंबंधित जनजागृती करण्यात येईल. तसेच सरक्षित वाहतकीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, शहरातील वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
महापालिका आयुक्त यांच्या दालनात प्रशासक शेखर सिंह यांच्या स्वाक्षरीने हा करार करण्यात आला. या सामंजस्य कराराच्या प्रसंगी स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, शहर अभियंता तथा स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी (एबीडी) मकरंद निकम, मुख्य वित्त अधिकारी सुनील भोसले, कंपनी सचिव चित्रा पवार यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
आयटीडीपी ही संस्था जगभरातील शहरांमध्ये सुरक्षित, आधुनिक आणि कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाना प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करते. पिंपरी चिंचवड महापालिका सोबतच्या सामंजस्य कराराच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे प्रदूषणाची पातळी घटण्यास मदत होणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.















