न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेतील विविध विभागातील ब आणि क गटातील ३८६ पदांसाठीच्या सरळ सेवा भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यात येत आहे. आत्तापर्यंत विविध पदांसाठी तब्बल १ लाख अर्ज आहेत. मात्र, त्यानंतरही महापालिकेने अर्ज करण्यासाठी १९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
महापालिका सेवेतून दरमहा नियत वयोमानानुसार २० ते २५ अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. काही कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती घेत आहेत, त्यामुळे महापालिकेत सुमारे पाच हजार पेक्षा पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांचा अनुशेष भरून काढण्यासाठी महापालिकेने सरळ सेवेने भरती प्रक्रिया करण्यास सुरुवात केली आहे.
विविध विभागातील ब आणि क गटातील ३८६ रिक्त पदांसाठी सरळ सेवेने भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये लिपिक २१३, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ७५, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ४१, कनिष्ठ अभियंता (विद्युत) १८, आरोग्य निरीक्षक १३, अतिरिक्त कायदा सल्लागार १, विधी अधिकारी १, उपमुख्य अग्शिमन अधिकारी १, उद्यान निरीक्षक ४, हॉट्रीकल्चर सुपरवायझर ८ अशी विविध पदांसाठी महापालिकेने ऑनलाईन अर्ज मागविले आहेत.
महापालिकेच्या ३८६ पदांसाठी सरळ सेवेने भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यापूर्वी ८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्यास मुदत होती. आत्तापर्यंत १ लाख अर्ज आले आहेत. आणखी स्पर्धा व्हावी, इच्छुकांना अर्ज करता यावेत, यासाठी महापालिकेने मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता १९ सप्टेंबर सायंकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे.
– बाळासाहेब खांडेकर, सहाय्यक आयुक्त प्रशासन विभाग…















