न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागासाठी दोन प्रशासन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी आदेश जारी केला आहे.
ब क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी अभिजात हराळ यांची कर संकलन व अभिलेख कक्ष, नागरी सुविधा केंद्र तर ह क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी शितल वाकडे यांची करसंकलन विभागाच्या प्रशासन अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.















