न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२२) :- रिक्षाचालक फिर्यादी हे रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास कासारवाडी रेल्वे स्थानकावरून त्यांच्या घरी मोशी येथे जात होते. दरम्यान, आरोपींनी हात दाखवून रिक्षा थांबवली. वायसीएम हॉस्पिटल येथे जायचे असल्याचे सांगून जेवणाचा डबा आणण्यासाठी पिंपळे गुरव येथे जायचे असल्याचे सांगितले.
आरोपी रिक्षात बसून पिंपळे गुरव येथील ओंकार कॉलनीत आले. तेथे फिर्यादीला मारहाण करून रिक्षाच्या मागील सीटवर बसवले. नर्मदा रोडने जात असताना पुन्हा त्यांना मारहाण करून ‘तू आमचे ऐकत नसशील तर तुला येथे मारून टाकू’ अशी धमकी दिली.
यामुळे फिर्यादी यांनी रिक्षातून उडी मारली. त्यानंतर आरोपीने फिर्यादीची रिक्षा, दोन हजारांचा मोबाईल व पाकीट असा एकूण ५२ हजारांचा ऐवज लुटला. संदीप दिलीप थोरात (रा. भारत माता चौक, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.















