- महापालिकेच्या उपायुक्त स्मिता झगडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, प्रशांत जोशी यांची बदली झाली आहे. ढाकणे यांच्या जागी महापालिकेच्या उपायुक्त स्मिता झगडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्याच्या नगरविकास विभागाकडून तसे आदेश काढण्यात आले आहेत. विकास ढाकणे यांची १२ फेब्रुवारी २०२१ रोजी पिंपरी-चिंचवड पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्रतिनियुक्तीने नियुक्ती झाली होती. त्यांनी १५ फेब्रुवारी रोजी पदभार स्वीकारला होता.















