न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. १५ सप्टेंबर २०२२) :- मैत्रिणीशी असलेल्या प्रेम संबधावरून आरोपीने तरुणाला त्याच्या मैत्रिणीसमोर मारहाण केली. यामुळे अपमानित होऊन वाईट वाटल्याने तरुणाने २५ मे २०२२ रोजी भोसरीत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
प्रतीक संतोष कुतवळ (वय २०, रा. शास्त्री चौक, आळंदी रोड, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तरुणाचे वडील संतोष जालिंदर कुतवळ यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रथमेश महादू पठारे (वय २०, रा. चऱ्होलीगाव) याच्यावर , प्रतीकला अपमानित करीत मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बुधवारी (दि. १४) भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.