न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ सप्टेंबर २०२२) :- दिघीतील देहूफाटा येथील योगीराज लॉजमध्ये पोलिस असल्याची बतावणी करून लॉजमधील रजिस्टर तपासले. तेथील लोकांकडे चौकशी करून रखवालदाराला मारहाण केली. राम अरुण काळे (रा. आळंदी) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार प्रल्हाद रामदास तांदळे (वय ३४, रा. गुंजाळ वस्ती, वारजे माळवाडी), छाया प्रल्हाद खैरनार (वय ३७), प्रथमेश राजेश जोशी (वय २०), विजय विद्यानंद धोत्रे (वय १९). अंकिता विद्यानंद धोत्रे (वय २२, सर्व रा., रा. सिंहगड रोड, जाधवनगर, पुणे) यांच्यासह एका अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल झाला आहे.